अमळनेर:- तालुक्यातील भरवस व सबगव्हाण येथे गावठी दारू विक्रेत्यांवर मारवड पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपनीय माहितीच्या आधारे भरवस येथे मारवड पोलिसांच्या पथकाने भेट दिली असता सुमन विश्वास भील ही महिला घराच्या आडोश्याला दारू विक्रीच्या उद्देशाने बसल्याचे दिसून आले. मात्र तिला पोलिसांची चाहूल लागल्याने मुद्देमाल जागीच सोडून ती पळून गेली. त्याठिकाणी १४४० रुपये किमतीची १८ लिटर दारू मिळून आली असून नमुने घेवून उरलेल्या मालाचा जागीच नाश करण्यात आला. त्यानतंर सबगव्हाण येथे एक जण गावठी दारू विकत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकला असता एकनाथ शिवराम पाटील हा रंगेहाथ मिळून आला. त्याच्या कडे २००० रुपये किमतीची २५ लिटर दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. यावेळी दोन्ही आरोपींविरुद्ध मु. प्रो. अँक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अनुक्रमे पो. सचिन निकम व किशोर पाटील हे करीत आहेत.