अमळनेर:- महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी केंद्रप्रमुख रविंद्र लोकनाथ साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्याध्यक्ष अशोकराव महाले यांनी महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटनेच्या जी.एस.हायस्कूल येथे झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.
पदवीधर महासंघाचे गिरीश वाणी, केंद्रप्रमुख संघाचे राज्य प्रतिनिधी राज्य उपाध्यक्ष रविंद्र लाळगे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर ज्येष्ठ सल्लागार गोकुळ आनंदा पाटील उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख यांच्या समस्यांबाबत चर्चा होऊन समस्या सोडवण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन लाळगे यांनी केले याप्रसंगी जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली. जिल्हाध्यक्ष म्हणून रविंद्र साळुंखे,(अमळनेर) यांची तर सरचिटणीस म्हणून भटू पाटील (पारोळा) यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली, याचबरोबर इतर पदाधिकारी यांची देखील निवड करण्यात आली.या सभेसाठी पदवीधर महासंघ संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीष वाणी हे देखील उपस्थित होते
कार्यकारिणीत युवराज परदेशी (कार्याध्यक्ष), भटू पंढरीनाथ पाटील (सरचिटणीस), प्रमोद सोनार (सहसरचिटणीस), शरद सोनवणे (उपाध्यक्ष), दिपक पाटील (उपाध्यक्ष), संजय भानुदास पाटील (कोषाध्यक्ष), दिलीप सावंत (जिल्हा संघटक), चंद्रकांत मोराणकर (उपाध्यक्ष), अनिता परमार (महिला प्रतिनिधी व उपाध्यक्ष), शिवाजीराव माधवराव पाटील (ज्येष्ठ सल्लागार) सुरेश माधवराव ठाकूर (ज्येष्ठ सल्लागार), गोकुळ आनंदा पाटील (ज्येष्ठ सल्लागार), नासिर रशिद खान (उर्दू प्रतिनिधी) यांची निवड करण्यात आली असून कार्यकारणी सदस्यपदी अशोक सोनवणे (तालुकाध्यक्ष अमळनेर), करुणा देवकर (तालुकाध्यक्ष पारोळा), नरेंद्र सोनवणे (तालुकाध्यक्ष चोपडा), विजय ठाकूर (तालुकाध्यक्ष यावल), विजय धनराळे (तालुकाध्यक्ष पाचोरा), मनिषा सोनवणे (तालुकाध्यक्ष एरंडोल), वैशाली बाविस्कर (तालुकाध्यक्ष जळगाव), कोकीळा जगदाळे (तालुकाध्यक्ष धरणगाव), रागिणी लांडगे (तालुकाध्यक्ष रावेर), अशोक खेडकर (तालुकाध्यक्ष भडगाव),
प्रकाश निकम (तालुकाध्यक्ष चाळीसगाव), के.पी.चौधरी (तालुकाध्यक्ष भुसावळ) संजय ठोसर (तालुकाध्यक्ष मुक्ताईनगर), रविंद्र भालेराव (तालुका अध्यक्ष बोदवड),भानुदास तायडे (तालुकाध्यक्ष जामनेर) यांची निवड करण्यात आली आहे. सर्वसमावेशकाची कार्यकारिणी तयार करण्यात असून संघटनेची ध्येयधोरणे,आगामी काळातील वाटचाल याबद्दल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेने संघटनेचे संयुक्त बँक खाते उघडणे व इतर रेकॉर्ड पारदर्शकपणे कसे ठेवावे याबाबतीत लाळगे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान रवींद्र साळुंखे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.