
रो.ह.यो.च्या अंतर्गत लावलेल्या वृक्षलागवडीची केली पाहणी…
अमळनेर:- केंद्रीय समितीचे पथक प्रमुख रिजवान सर यांनी तालुक्यातील दहिवद येथे भेट देत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा अंतर्गत लावलेल्या वृक्षलागवडची पाहणी केली.
काल २६ रोजी रोजी केंद्रीय समितीचे पथक प्रमुख मा. रिजवान यांनी दहिवद येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना बिहार पॅटर्न अंतर्गत लावलेल्या वृक्षलागवडची पाहणी सोबत शोषखड्डे, विविध कामांची पाहणी केली. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य वर्षा गुलाब पाटील,शिवाजी पारधी, योगिता गोसावी, वैशाली माळी सदस्य यांचा हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रो.ह.योजने अंतर्गत मागील वर्षी लावलेल्या वृक्षलागवड, अटल घनवन (मियावकी) तसेच ह्या वर्षी लावलेल्या मियावकी वृक्षलागवड ची पाहणी करण्यात आली. कामांचा बाबतीत समाधान व्यक्त करत दहिवद ग्रामपंचायतीचे कोतुक करण्यात आले. समिती सोबत प्रसाद मते सर उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.), विशाल शिंदे गटविकास अधिकारी प.स. अमळनेर, प्रशांत पाटील(जिल्हा एमआयएस कॉरडीनेटर),किशोर ठाकरे, किशोर पाटील, धिरज पाटील राजेंद्र सोनवणे (ग्राम विकास अधिकारी), भागवत सोनवणे (रोजगार सेवक) रोजगार हमी योजना अंतर्गत काम करणारे मजूर महिला वर्ग व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.







