
एलसीबी व मारवड पोलिसांनी केली संयुक्त कारवाई….
अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर व निम येथे सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर एलसीबी व मारवड पोलिसांनी छापे टाकत दोघांवर कारवाई केली आहे.
गोपनीय माहिती मिळाल्यामुळे एलसीबी व मारवड पथकाने निम येथे भेट दिली असता एक इसम खाली बसून काही तरी लिहताना व दुसरा त्यास पैसे देताना दिसल्याने छापा टाकला असता दुसरा इसम चाहूल लागल्याने पळून गेला. खाली बसून सट्टा लिहणाऱ्या इसमास पकडले असता त्याने त्याचे नाव सुरेश उत्तम पाटील असल्याचे सांगितले. त्यांचेकडून ४२० रूपये रोख तसेच सट्टा जुगाराचे साहित्य मिळून आले. तसेच जैतपीर येथे पथकाने छापा टाकला असता प्रदीप बारकु कोळी हा इसम स्वतःच्या फायद्याकरिता सट्टा घेतांना आढळून आल्याने त्यास रंगेहाथ पकडले. त्याचेकडून ६४० रुपये रोख व सट्टाचे साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध मु. जु. अँक्ट १२ अ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.







