
गटविकास अधिकाऱ्यांना दिले प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील बऱ्याच गावातील सरपंच, उपसरपंचांचे मानधन थकल्याने गटविकास अधिकाऱ्यांना प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील बऱ्याच गावातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून थकले आहे. तरी असलेल्या तांत्रिक अडचणी सोडवून आपल्या स्थरावर पाठपुरावा करत मानधन मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुंदरपट्टीचे सरपंच सुरेश अर्जुन पाटील, भरवसचे सरपंच अशोक विनायक पाटील, वाघोदे सरपंच चेतन पाटील, लोण सरपंच कैलास भगवान पाटील, पिंपळे सरपंच दिनेश पाटील, आर्डी सरपंच किशोर पाटील, तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटील यासह विविध गावांचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.







