
वादळी पावसाने पिकाचे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे बु. शिवारातील मका व ऊस पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी निवेदन दिले.
फापोरे परिसरात 31 ऑगस्ट रोजी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात मका व उस या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्याचा तोंडावर आलेला घास जणू निसर्गाने हिरावून नेला. काढणीच्या वेळी आलेल्या वादळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ऊस व मका या पिकांना मोठ्या प्रमाणावर हानी झाली. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई साठी तालुका प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवण्यात यावा याकरिता शेतकरी सतिष रामलाल पाटील, माणिक बाबुराव पाटील, दिनेश सुभाष पाटील, माजी सरपंच जितेंद्र पाटील, सतिष गोरख पाटील , विनोद नामदेव पाटील , गणेश पांडुरंग पाटील, शोभा बाई शरद पाटील, विकास पंडीत पाटील, अक्षय पाटील, शशिकांत पाटील, प्रकाश पंडीत पाटील, प्रमिलाबाई गणेश पाटील, कल्पना बाई सुभाष पाटील , पुष्पराज पाटील, मधुकर पाटील हिंगोणे यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.







