बोहरा शिवारातील घटना, पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील बोहरा शिवारात राहणाऱ्या एकाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली आहे.
बोहरा येथील हंसराज पाटील यांच्या शेतात दादू भाईदास पावरा हा कामाला असून दिनांक ५ रोजी संध्याकाळी त्याचे वडील येवून सांगू लागले की, शेतातील पत्राच्या खोलीत त्याने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केले असून तो तेथे पडून आहे. त्यानंतर त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यावरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. कॉ. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.