अमळनेर:- काल तालुक्यातील विविध शाळांमध्ये ५ सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त करत अनेक काल शिक्षकांची भूमिका वठवली.
श्री एन.टी.मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल….
मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल अमळनेर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता १० वी च्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी प्राचार्य, शिक्षक व शिक्षिकांच्या भूमिका सादर करत शिक्षकांविषयी महत्व सांगत आदर व्यक्त केला. त्यात काही शिक्षकांनी गायन व नृत्य सादर करत सर्व विद्यार्थी व व्यवस्थापन मंडळाचे लक्ष वेधले. शिक्षक दिनानिमीत्त सर्व शिक्षक व शिक्षिकांना शाळेतर्फे गिफ्ट स्वरूपात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, पदाधिकारी, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
जी.एस.हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा…
शहरातील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल येथे विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी स्वयंशासन दिन साजरा केला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत वर्गात अध्ययन केले. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक दिनी वेगळा उत्साह पहायला मिळाला. एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी विद्यार्थी संघाकडून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. उपशिक्षक राहुल.जे.पाटील यांनी सर्वपल्ली राधाकृष्णण यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. शाळेचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व, तत्वज्ञान याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक आर.एल.माळी,बी.एस.पाटील जेष्ठ शिक्षक एस.बी.निकम, ए.डी. भदाणे,एस.आर.शिंगाणे, सी. एस.सोनजे उपस्थित होते.
विद्यार्थी संघाचे प्रमुख उपशिक्षक एस.आर. अहिरे, एस.ए.बनसोडे यांनी यशस्वी नियोजन केले.सूत्रसंचालन एस.आर.अहिरे यांनी केले तर आभार आर.जे.पाटील यांनी मानले.
श्री दत्त विद्या मंदिर व व उच्च माध्यमिक विद्यालय, पातोंडा
पातोंडा येथील श्री दत्त विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयात डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव घेतला. शिपाई पासून मुख्याध्यापकां पर्यंत सर्व शालेय कारभार विद्यार्थ्यांनीच पाहिला. याप्रसंगी सपना कोळी हिने मुख्याध्यापकाचे हर्षाली बिरारी हिने पर्यवेक्षक , शिक्षक म्हणून साक्षी पाटील , ऋतिका पाटील , रूद्राक्ष महाले , जान्हवी लोहारे , प्रगती पाटील , पल्लवी पारधी , जयश्री ठाकरे, नम्रता चौधरी , शुभांगी बाविस्कर, देवेंती भोई, अपेक्षा मराठे , महेश्वरी पाटील , वैष्णवी पवार , शुभांगी पारधी , रितू महाजन, सुमित सोनवणे , दुर्गेश्वरी पाटील, शिवराज बोरसे, भावेश पाटील, पुनीत पाटील , मेघा शिंदे, वरूण चौधरी , भुमिका संदानशिव, कोमल पाटील यांनी काम पाहिले तर प्रशांत साळुंखे, गौरव सोनवणे , हरीष सुतार यांनी शिपाई म्हणून काम पाहिले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामकाज पाहिले म्हणून मुख्याध्यापक प्रदिप शिंगाणे व पर्यवेक्षक व्हि. सी.पाटील यांनी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. बडोदा बॅक पातोंडा शाखेचे शाखा व्यवस्थापक भुषण यवलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव आल्यामुळे त्यांना मनस्वी आनंद झाला असल्याचे मनोगत विद्यार्थी मुख्याध्यापिका सपना कोळी हिने व्यक्त केले.
पातोंडा जि.प. मराठी मुलांची व मुलींची शाळा…
पातोंडा जि.प. मराठी मुलींच्या शाळेत देखील विद्यार्थीनी मानसी पाटील , निकीता बोरसे , राधिका बिरारी , वैष्णवी कोळी , वैष्णवी लोहारे , चेतना देशमुख , निकीता देशमुख, हर्षदा पवार , खुशबू मोरे , भुमि पाटील , अलिया खाटीक , वेदिका लांबोळे या विद्यार्थ्यीनींनी शिक्षक म्हणून अनूभव घेतला. सर्व विद्यार्थी शिक्षकांचे मुख्याध्यापक कैलास माळी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पातोंडा जि.प. मराठी मुलांची शाळा…
येथे पार्थ बिरारी , कृष्णा पाटील , भाग्येश लांबोळे, चिराग झंझणे , आदित्य वाघ व उमेश बडगूजर या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले. मुख्याध्यापिका सरला बाविस्कर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.
खवशी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन साजरा…
तालुक्यातील खवशी येथील जि.प.उच्च मराठी शाळेत शिक्षक दिन उत्सवात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्यां प्रतिमेस माल्यार्पण करून पुजन करण्यात आले व नंतर शाळेतील सर्व शिक्षकांचा श्रीफल व बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकां विषयी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या वेशभुषेत आले होते. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद कापडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्यवंशी,सदस्य रोहीदास कापडे मुख्याध्यापक हिम्मत चौधरी, शिक्षक पंकज शिसोदे,अजय कोळी,दिलीप कंखरे , शिक्षिका पुणम पवार व विद्यार्थी उपस्थित होते.
मुडी येथे गायत्री परिवारातर्फे शिक्षक दिन साजरा…
मुडी प्र. डां. येथील झेड् डी सोनवणे हायस्कूल येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला यावेळी मुडी येथील गायत्री परिवारातर्फे सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ व अखंड ज्योती पुस्तकाचे भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनींनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आपले विचार मांडले यावेळी गायत्री परिवारातील राजमल जी बोरसे यांनी. मनोगत व्यक्त केले. यावेळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पेन देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास यावेळी गायत्री परिवारातीन राजमल बोरसे, महेंद्र भाऊराव पाटील, शिवाजी पाटील, गुलाबराव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा पाटील व जानवी पाटील यांनी केले. आभार अनिल सर यांनी मानले.
सु.हि.मुंंदडे हायस्कुल व श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय मारवड…
५ सप्टेंबर रोजी डाँ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कामकाज केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जयवंतराव पाटील अध्यक्ष ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड यांनी भुषविले.विद्यालयाचा माजी विद्यार्थी संदेश गजमल शिंदे यांची नाशिक महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार जयवंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी जी.बी.शिंदे, माजी उपमुख्याध्यापक शांताराम शामराव पाटील, माजी प्राचार्य हरीभाऊ मारवडकर, यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना भावी वाटचालीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांप्रती आदरभाव ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. सदर प्रसंगी ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील पदाधिकारी प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.