
आमदारांच्या मध्यस्थीने भजन आंदोलन घेतले मागे…
अमळनेर:- तालुक्यातील श्री श्रेत्र कपिलेश्वर येथील अतिक्रमण प्रश्र्नी वेळोवेळी निवेदन देऊन ही प्रशासनाने दखल न घेतल्याने विश्वस्त व भाविकांनी तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या ग्वाहीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
काल सकाळी मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज यांच्या सह मंदिराचे विश्वस्त, ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत तहसील आवारात भजन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आमदारांनी भेट देत दिली असता तहसीलदारांच्या दालनात बैठक होवून लवकरच शासकीय मोजणी व दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक 30 सप्टेंबर पूर्वी घेऊन हा प्रश्न कायमचा सोडविला जाईल असा असे आश्वासन आमदार अनिल पाटील, तहसीलदार व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्याचे जाहीर केले. यावेळी आमदारांसह डॉ. अनिल शिंदे, प्रा अशोक पवार, गोकुळ बोरसे, हंसानंदजी तीर्थ महाराज, रामानंद महाराज, परमेश्वर महाराज, भागवत गुरुजी, एपीआय जयेश खलाने, मगन भाऊसाहेब यासह पाठशाळेतील विद्यार्थी, भाविक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होती.
सन २००६ पासून अतिक्रमण वाद सुरू असून त्याबाबत मंदिर संस्थान व विश्वस्तांनी वेळोवेळी कायदेशीर मार्ग अवलंबून ही बाब निकाली निघत नसून चालढकल होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलून हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आता विश्वस्तांनी व्यक्त केली आहे.







