
भिलाली एकतास रस्त्यावर झाला होता अपघात, दुसरी मुलगी गंभीर जखमी…
अमळनेर:- तालुक्यातील भिलाली एकतास रस्त्यावर पिकअप गाडीने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मुलींना धडक दिली होती. त्यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरी मुलगी अद्याप गंभीर आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी दिलीपसिंग गिरासे यांच्या फिर्यादीनुसार दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भिलाली एकतास रस्त्यावरून फिर्यदीची मुलगी जान्हवी गिरासे (वय १८) व भाची विद्या मंगलसिंग गिरासे जात असताना बोलेरो पिकअप क्र. एम एच ०६ बीजी १९७१ गाडीने भरधाव वेगाने गाडी चालवून मागून धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी जान्हवी हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून विद्या हिच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात गाडी चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. सचिन निकम हे करीत आहेत.







