
पोलीस भरती संघटनेची निवेदनाद्वारे मागणी…
अमळनेर:- पोलीस भरतीत एनसीसी प्रमाणपत्र धारकांना मिळत असलेल्या काही टक्के वाढीव गुणांमुळे सामान्यवर्गातील उमेदवारांवर एकप्रकारे अन्याय आहे, गुण रद्द करावेत, अशा आशयाचे निवदेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रांताधिकारी सिमा अहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आले.

सदर निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनातर्फे एनसीसी प्रमाणपत्र धारकांना पोलीस भरती प्रक्रियेत २, ३ आणि ५ टक्के वाढीव गुण मिळत असतात, यामुळे सर्वसामान्य उमेदवारावर एकप्रकारे हा अन्यायच आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत सामान्य विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतो, त्यातच एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवार वाढीव मिळणाऱ्या गुणांमुळे पुढे निघत असतो. सामान्य उमेदवाराकडे कुवत असूनही तो अपयशी ठरतो, हा एकप्रकारे अन्यायच आहे. नेते आपआपल्या सोईनुसार नियम बदलवत असतात, त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या तरुणाने करावे तरी काय करावे अशा विवंचनेत फसला आहे. आगामी भरतीप्रक्रियेपुर्वी सदर नियम बदलविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती संघटना, अमळनेरतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदनावर महेंद्र मधुकर पाटील, सचिन राजमल भोई, मनिष विश्वास पाटील, हर्षल देविदास कुंभार, आकाश बन्सिलाल पारधी, प्रशांत चुडामण कुंभार, जयेश बळीराम चव्हाण, प्रदिप भरत चौधरी, योगेश प्रकाश कोळी, गौरव महेंद्र पाटील, रोहन सुभाष वाल्हे, रोहित धर्मेंद्र पाटील, जयेश पुरुषोत्तम पाठक, वैभव किशोर सैंदाणे, नयन सिताराम वारुळे, प्रदिप जगदीश निकम, राजेंद्र कृष्णा पाटील, ललित सतिश पाटील, भरत पन्नालाल शिंदे आदींच्या सह्या आहेत.








