
तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीच्या वतीने दिले निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे गावाची सांसद आदर्श ग्राम म्हणून निवड झाल्याने विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली. या वेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, नाला संरक्षण भिंत, गटारी आदींसाठी ४० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन खासदारांना दिले. यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपुत, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप महाजन यांसह मान्यवर उपस्थित होते.








