वाचन प्रेमींना पाच दिवस पुस्तके वाचण्यासाठी मिळणार..
अमळनेर:- भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
वाचन प्रेरणा दिनाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रमेश माने हे होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, वाचनामुळे मेंदूला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्यांच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळते तसेच ज्ञानात भर पडते. सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत दूरदर्शन संगणक व त्यावर खेळले जाणारे खेळ मोबाईलवरील खेळाशी साधने आपल्याला मानसिक आनंद देतात परंतु वाचनामुळे आपण लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. आपण त्यातील प्रत्येक पात्र जगत असतो असे, प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ रमेश माने यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त केले. ते पुढे असेही म्हणाले की, डॉ कलाम यांचे कार्य आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगितले. सानेगुरुजी वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने पुस्तक पेढी तयार करून वाचन प्रेमींना पाच दिवस वाचण्यासाठी खुले ठेवले आहे. यावेळी उपस्थित मान्यवराचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ व ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव यांनी केला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, माजी उपप्राचार्य प्रा. एन के कुलकर्णी, वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन, प्रसाद जोशी, दीपक वाल्हे व वाचन प्रेमी सुकलाल चौधरी, मगन भोईसह वाचनालयाचे कर्मचारी समिता धाडकर, रमेश सोनार, सुरेश जोशी, मधुकर बाळापूर उपस्थित होते.