
विविध कार्यालयात भेटी देत घेतला कामांचा आढावा…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया हे बुधवारी अमळनेर दौऱ्यावर असताना त्यांनी गडखांब गावात भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतला.

ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी त्यांचा ग्राम पंचायत कार्यालयात यथोचित सत्कार केला. ग्राम पंचायतीचा कामांचा आढावा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून घेऊन त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली. शाळेत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.त्यावेळी शाळेच्या विविध उपक्रम व शालेय कामकाजाचा शिक्षकांकडून आढावा घेतला. तसेच अंगणवाडी केंद्रात देखील त्यांनी भेटी दिल्या. तसेच सॅम मॅम बालकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन दिले. यावेळी गटविकास अधिकारी,पंचायत समिती व विविध विभागाचे कर्मचारी,सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, शिपाई, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा स्वयंसेवीका आदी उपस्थित होते.







