अमळनेर:- अमळनेर ते धुळे रस्त्यावर मंगरुळजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने शिरूड येथील एका ३४ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील शिरूड येथील जितेंद्र नारायण मोरे (वय 34) हा सेंट्रिंग काम करीत होता. काम आटोपुन घरी जात असताना मंगरुळ ता. अमळनेर येथील गायत्री मंदिराजवळ त्याच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने तो रस्त्यावर पडून डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. अपघातस्थळी असणाऱ्या नागरिकांनी त्याला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मयत जितेंद्रच्या पश्यात आई, मोठा भाऊ व बहीण असा परिवार आहे. अतिशय होतकरू व कष्टाळू युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती होत आहे. शिरुड पो.पा विश्वास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.