५ नोव्हेंबर रोजी होणार सांगता, महाप्रसादाचे आयोजन…
अमळनेर:- तालुक्यातील मालपुर येथे दिनांक २९ नोव्हेंबर पासुन अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही या ज्ञानामृत किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे १६ वे वर्ष आहे. यंदा हभप रामचंद्र महाराज मालपुरकर, हभप सूनिताताई महाराज टाकळीकर, हभप वैष्णवीताई, हभप रामकृष्ण सानप महाराज, हभप जनार्दन महाराज आरावेकर, हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, हभप अनंतदासजी कजवाडेकर यांचे अनुक्रमे कीर्तन होणार आहे. काकड आरती सकाळी ५ ते ६, हरिपाठ सायंकाळी ५ ते ६, कीर्तनाची वेळ रात्री ८:३० ते १० असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे. महाप्रसादाचे मानकरी प्रा. गणेश महादेव पवार हे असून महाप्रसादास दिनांक ५ रोजी ११ वाजेपासून सुरुवात होणार आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी हजेरी लावावी असे आवाहन करण्यात येत आहे.