अमळनेर येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे आयोजन…
अमळनेर :- येथील बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे’ बलिप्रतिपदे निमित्त बळीराजाची भव्य गौरव मिरवणूक संपन्न झाली.
“इडा पिडा टळो बळीच राज्य येवो ।” या घोषणांसह शेतकरी व बळीराजाची गीते गात सवाद्य अशा भव्य मिरवणुकीस शिरुड नाका येथे सुरवात करण्यात आली. बळीराजाच्या भव्य प्रतिमेस बैलगाड्यावर सजवून उभी करण्यात आलेले होते, एका बैलगाड्यावर भव्य लाकडी नांगर ठेवण्यात आलेला होता. आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते जिजाऊ व छत्रपती शिवरायांचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीचा प्रारंभ वसुंधरा लांडगे यांच्या जिजाऊ वंदनाने करण्यात आला, मिरवणुकीत विविध शेतकरी गीते सेवा संघाचे कैलास पाटील यांनी सादर केली. यावेळी प्रा. अशोक पवार, माजी नगरसेवक विनोद कदम, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामेश्वर भदाणे, प्रेमराज पवार, अशोक पाटील, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ वैशाली शेवाळे, खा. शि. मंडळाचे संचालक डॉ. अनिल शिंदे, दिलीप पाटील, चंद्रकांत देसले, दिपक काटे, एस एम पाटील, डॉ युवराज पाटील, जेष्ठ कार्यकर्ते मनोहर पाटील, शिवाजीराव पाटील, अरुण देशमुख, डॉ. विलास पाटील, भूषण भदाणे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. लिलाधर पाटील, सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते रणजीत शिंदे यांनी तर आभार बापूराव ठाकरे यांनी व्यक्त केले. बळीराजा गौरव मिरवणूकीत विविध चौकात भगिनींनी बळीराजाचे पूजन केले. सदर मिरवणुकीचा समारोप शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बळीराजा स्मारक येथे संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष नगरसेवक श्याम पाटील, मराठा मंगल कार्यालय चे अध्यक्ष जयवंतराव पाटील, इंजीनियर श्रीकांत चिखलोदकर, डी. वाय. एस.पी राकेश जाधव, पत्रकार चंद्रकांत काटे, मुन्ना शेख, विनोद खेरनार, चंद्रकांत जगदाळे, मनोज शिंगाने, सयाजीराव कापडणेकर, युवा उद्योजक दिपक पाटील, रणजितसिंग पाटील, प्रभाकर पाटील, रविंद्र मोरे आदीनी पुष्प अर्पण करून पूजन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. बळीराजा गौरव मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवा पाटील, गुलाब नाना, संजय उत्तम पाटील, रवी महाजन, संजय पाटकर, सोनू पाटील, अमोल पाटील, बापू मिस्तरी, नरेंद्र अहिराव, लक्ष्मण पाटील, संदीप खैरनार, विजय पाटील, अनंत सूर्यवंशी, कुंदन पाटील, अनिल शेटे यासह जय अंबे मित्र मंडळ व तरुण कुडापा व मित्र मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.