तालुक्यातील टाकरखेडा येथे घडली दुर्दैवी घटना…
अमळनेर:- तालुक्यातील टाकरखेडा येथील २७ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना काल २८ रोजी घडली आहे.
स्वप्नील मच्छिंद्र पाटील असे या मयत तरुणाचे नाव असून सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास अमळनेर रोडवर असलेल्या शेतातील नाश्त्याच्या हॉटेलवर झाडांना पाणी देत असताना त्याचा पाय कट झालेल्या वायरवर पडल्याने जोरदार विजेचा धक्का बसला. त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सदर तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.