वाजत गाजत, शिस्तबद्ध पद्धतीने दिंडींचे नियोजन…
अमळनेर– काल दिनांक २९ ऑक्टोबर 2022 रोजी अमळनेर ते शेगांव पायीदिंडी अमळनेर हून जल्लोषात व शिस्तबद्ध पद्धतीने रवाना झाली.
सकाळी पाच वाजता श्री गजानन महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर जी.एम सोनार नगर अमळनेर येथून पायी वारीची सुरुवात झाली. सकाळी गजानन महाराज यांचे पादयपूजन करण्यात आले. यावेळी वारीप्रमुख आर.बी.पवार सर, ज्योती पवार,नितीन भावे, अशोक भावे,रघूनाथ पाटील सह उपस्थित होते. 29 ऑक्टोबरला निघालेली पायीवारी 3 नोव्हेंबरला शेगांवला पोहोचणार आहे. पायीवारीतील गजानन भक्तांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचा मुक्काम व जेवन याची सर्व व्यवस्था गजानन फक्त व सामाजिक कार्यकर्ते व संस्थांचे पदाधिकारी यांनी केले आहे. निघालेली पायीवारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघून सर्व गजानन भक्त दिंडीतील नाचत गाजत जात असल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. रस्त्यात अनेक कॉलनीमध्ये महिला मंडळांनी रांगोळी काढत दिड्डीचे स्वागत केले.गजानन शेगांव पायी वारीला अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, भावीक यांनी भेट देत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. या पायी वारीचे दहावे वर्ष आहे. अनेक भाविक वृद्ध यात स्वखुशीने सहभागी झाले.
यावेळी अमळनेर तालुक्यातील मारवड, पातोंडा,खापरखेडा, करणखेडा,भिलाली, कोळप्रिपीं, पिंगळवाडे,अमळगांव, तामसवाडी, सात्री, डांगरीसह तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गजानन भक्त पायी दिंडीत सहभागी झाले.