
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे धरणाजवळ तापी नदीकाठी ७२ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृत महिला ही चोपडा तालुक्यातील घडवेल येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घडवेल येथील शांताबाई रमण पाटील ह्या बेपत्ता असल्याने त्यांचा पुतण्या शोध घेत असताना पिलोदा (ता. शिरपूर) येथे त्यास पाडळसरे धरणाजवळ प्रेत वाहून आल्याची माहिती मिळाल्याने त्याने प्रेत पाहिले असता त्याची काकू असल्याचे ओळखले. मारवड पोलीसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एएसआय बालकृष्ण शिंदे करीत आहेत.







