
अमळनेर:- शहरातील देशमुख नगर भागात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने जानवे शिवारात असणाऱ्या एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

तेजस मनोहर मगर वय 28 रा. देशमुख नगर असे मृत तरुणाचे नाव असून तो दि. 12 रोजी सकाळी सलूनला जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र 10 वाजेच्या सुमारास त्याच्या मृत्यूची बातमी घरी आल्याने कुटुंबावर संकट कोसळले. जानवे शिवारात एका विहिरीत त्याने उडी घेवून आत्महत्या केली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. हितेश चिंचोरे हे करीत आहेत.







