मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती…
अमळनेर:- शहरातील पद्मश्री हॉस्पिटल संचलित लाईफ लाईन क्रिटिकल सेंटरचा आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी शुभारंभ होणार असून अनेक मान्यवरांची मांदियाळी यावेळी राहणार आहे.
दिनांक १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून उद्घाटन प्रसंगी मंत्री गिरीश महाजन, आ. सुधीर तांबे, आ. अनिल पाटील, मा.आ. स्मिता वाघ, मा.आ. शिरीष चौधरी, मा.आ. साहेबराव पाटील, डॉ. बी एस पाटील, डॉ. अनिल शिंदे, सौ. तिलोत्तमा पाटील, जयवंतराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या लाईफ लाईन क्रिटिकल केअर सेंटर मध्ये १५ बेडचे वातानुकूलित आयसीयू असून तालुकावासियांसाठी २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहणार आहे.