आ.अनिल पाटलांच्या हस्ते झाले विकास कामांचे भूमीपूजन..
अमळनेर:-येथील ढेकू रोड वरील कृषीनगर परिसरात दत्त मंदिर येथे खुल्या जागेवर काँक्रीटकाम करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रक्कम रु.10 लक्ष निधी मंजूर झाल्याने यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सदर भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी आमदारांचे कॉलनी वासीयांनी जोरदार स्वागत करून सत्कार केला. यावेळी आमदारांनी मनोगत व्यक्त करताना विकास कामांचा आढावा मांडून शहरात विकास कामसोबतच अवैध धंद्यांना रोखने हे देखील आपले उद्दिष्ट असल्याचे सांगत ते आज बऱ्यापैकी कमी झाल्याने शहरात कुठेतरी बदल घडलाय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.व ढेकू रोड आणि पिंपळे रोड परिसरासाठी नेहमीच काहिनाकाही करीत राहील अशी ग्वाही आमदारांनी दिली.
यावेळी एस टी कामगार नेते एल.टी.पाटील, गायत्री दीपक पाटील (नगरसेविका), दिपक पाटील (वावडे), देविदास देसले, आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुनिल पवार, रढावणचे भैयासाहेब पाटील, पंकज पाटील, अजबराव पाटील, राजेंद्र पाटील, डी.डी. पाटील, सुनिल पाटील, रविंद्र पाटील, अविनाश जाधव, मनिष भावसार, सुरेश पाटील, दिलिप ठाकरे, युवराज शिंदे, विश्वास ठाकरे, इच्छाराम पाटील, डॉ. चंद्रशेखर भदाणे, मधुकर मराठे, रघुनाथ शिंदे, राजेश बारड, रतीलाल भावसार, डी.बी. पवार, आर.एच.सोनवणे, विजय बडगुजर, बी.ऐन.पाटील. अजय पवार, दत्तात्रय निकुंभ, संजय जगताप, संजय सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, गुलाबराव शिसोदे, संजय विसपुते, गुलाबराव पवार, पंकज सूर्यवंशी, वसंत पाटील, पंकज पाटील, आर.डी.महाजन व नागरिक उपस्थित होते.