
विविध मान्यवरांसह तालुक्यातून शुभचिंतक व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हजेरी…

अमळनेर:- शहरातील पद्मश्री हॉस्पिटल संचलित लाईफ लाईन क्रिटिकल सेंटरचा शुभारंभ मोठ्या दिमाखात दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला.

या लाईफ लाईन क्रिटिकल केअर सेंटर मध्ये १५ बेडचे वातानुकूलित आयसीयू असून तालुकावासियांसाठी २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आ. सुधीर तांबे, आ. अनिल पाटील, मा.आ. स्मिता वाघ, मा.आ. शिरीष चौधरी, डॉ. बी एस पाटील, डॉ. अनिल शिंदे, सौ. तिलोत्तमा पाटील, जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, सुलोचना वाघ, डॉ. संदीप जोशी आदी मान्यवरांनी हजेरी लावली.

यावेळी नामदार महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना योग्य “उपचारासोबत रुग्णाला दिलासा देण्याची ही गरज असते. जी एम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना दिलेली वैद्यकीय मदत व रुग्णसेवा हीच मला तारून नेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अन्य मान्यवरांनी ही मनोगत व्यक्त करत स्व. डॉ. पी. एन. बापू यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा रुग्णसेवेचा वारसा डॉ. विक्रांत समर्थपणे पुढे नेत असल्याचा आशावाद व्यक्त करत डॉ. विक्रांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातून शुभचिंतक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.








