
झाडी येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथे शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना काल १६ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, झाडी येथील जिजाबराव खंडू पाटील (वय ५२) हे सकाळी झाडी शिवारातील शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना विषारी सापाने दंश केल्याने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. सचिन निकम हे करीत आहेत.







