
मुंगसे, ता. अमळनेर:- येथुन जवळच असलेल्या धुनीवाले दरबार निमगव्हाण येथे चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत असलेले परमपूज्य संत श्री बालयोगी जी महाराज हे प्रथमच तापी परिसरात येत असून त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे .

तपस्वी, वंदनीय १००८ महामंडलेश्वर ‘संत श्री बाल योगीजी महाराज’ हे प्रथमच परीसरात येऊन अमृतमय वाणीद्वारा प्रवचन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सत्संगपुर्वी दुपारी ठिक ३ वाजता निमगव्हाण गावात संत श्री बाल योगीजी महाराज यांची ‘शोभायात्रा’ देखील होणार आहे. हा कार्यक्रम ‘तिर्थक्षेत्र श्री.श्री.१००८ धुनिवाले दादाजी दरबार, निमगव्हाण (ता.चोपडा) येथे संपन्न होणार असून सदरील कार्यक्रमाचे आयोजन ‘श्री.श्री. १००८ श्री.धुनिवाले दादाजी प्रतिष्ठान, निमगव्हाण’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या शुभप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घेवून धर्म कार्यात सहभागी व्हावे. प्रवचनानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यांत आले आहे.







