
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, दि. 18 नोव्हेंबर रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगांव द्वारा आयोजित राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी गांधी विचार संस्कार परीक्षेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

परिक्षेच्या सुरुवातीला गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. सतीश पारधी यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेविषयी आपली भूमिका मांडून महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी अध्यक्षीय भाषणात म. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात सत्य, अहिंसा व शांततेचा मार्ग स्विकारीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाची भूमिका बजावली आहे, असे मत व्यक्त केले. सद्य स्थितीत ग्रामोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम विद्यार्थ्यांनी भावी जीवनात करावे. विद्यार्थी जीवनात याचा अंगीकार करून देशासाठी आपली सेवा द्यावी असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला. दरवर्षी गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी विचार संस्कार परीक्षांचे आयोजन विद्यार्थ्यांनसाठी केल्याबद्दल फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. जितेंद्र माळी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ.संजय पाटील, प्रा. डॉ.संजय महाजन, प्रा. डॉ. माधव वाघमारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.







