अमळनेर:- येथील पंचायत समितीतील सहा. गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचे पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास अपघाती निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
शासकीय कामानिमित्त यावलहून नाशिककडे आपल्या शासकीय वाहनाने जात असताना पहाटे धरणगाव जवळ उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. चौधरी हे ड्रायव्हरच्या बाजूला बसले होते व तीच बाजू ट्रकला ठोकल्याने मार लागल्याने त्यांचे या अपघातात निधन झाल्याची वार्ता असून ड्रायव्हरला किरकोळ मार लागल्याचे समजते आहे. याप्रकरणी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शव नेण्यात आले असून धरणगाव पोलीसात फिर्याद देण्याचे काम सुरू आहे. त्याच्याकडे अमळनेरसह यावल पंचायत समितीचा ही अतिरिक्त पदभार होता. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी चांगले संबंध होते. या दुःखद बातमीमुळे तालुक्यांत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.