
जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी लाभ घेण्याचे आवाहन…
अमळनेर:- येथील मंगळग्रह सेवा संस्था व शासनाचा कृषी विभाग यांच्यातर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवार,२५ नोव्हेंबर रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे सकाळी १० वाजता मार्गदर्शनपर शिबिर होणार आहे. त्यात रब्बी हंगाम पूर्व क्षेत्रीय किसान गोष्टी, पी एम फ एम ई योजनेचे फॉर्म भरणे व जागतिक पर्यावरण संवर्धन दिवस साजरा करणे आदी बाबींचा समावेश आहे. जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.








