
अमळनेर:- तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बाळकृष्ण पोतदार (वय 52) यांचे बुधवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एक अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार म्हणून पोतदार यांची ओळख होती. सुरुवातीच्या काळात पोतदार यांनी ‘आपला अधिकार’ हे स्वतः च साप्ताहिक सुरू केले होते. त्यांनतर आघाडीच्या वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ काम सुरू होते. त्यामुळे त्यांनी सामाजिक, प्रशासकीय व पत्रकारिता मित्रांचा मोठा गोतावळा त्यांनी जमविला होता.








