अमळनेर:- येथील अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल पो. नि. जयपाल हिरे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आला.
मुद्देमाल निर्गती मोहिमेअंतर्गत पोलीस ठाण्यात दाखल भादवि कलम ३०२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील १ ग्रॅम सोन्याच्या व ३ ग्रॅम चांदीच्या बाह्या ललित पाटील यांना परत देण्यात आल्या. भादवि कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम सोन्याची लगड सुधाकर चौधरी यांना परत देण्यात आली. भादवि कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्ह्यातील ३० ग्रॅम सोने व १ किलो चांदीची लगड मूळ मालक किशोर शिवाजी पाटील यांना पराग देण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते मुद्देमाल परत करण्यात आला. त्यामुळे मूळ मालकांनी अमळनेर पोलिसांचे आभार मानले आहेत.