
मराठी वाड्मय मंडळ व सामाजिक समरसता मंच यांच्यातर्फे आयोजन…
अमळनेर:- भारतीय संविधान दिनानिमित्त येथील मराठी वाड़मय मंडळ व सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संविधान पूजन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमीत्त मराठी वाड़मय मंडळ व सामाजिक समरसता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने म.वा. मंडळाच्या कै.रावसाहेब नांदेडकर सभागृह येथे संविधान पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच यावेळी प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा.डॉ.ललित मोमाया यांचे व्याख्यान होणार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.बी. बैसाणे यांची या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती रहाणार आहे.तरी या कार्यक्रमास श्रोत्यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन मराठी वाड़मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी व सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक प्रकाश ताडे यांनी केले आहे.







