जामिनावर सुटल्यानंतरही तीन गुन्हे करून होता फरार…
अमळनेर:- येथील कुख्यात गुन्हेगार शुभम मनोज देशमुख यास अमळनेर पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडुन तो फरार असलेल्या तीन गुन्ह्यांत अटक केली
शहरातील कुख्यात गुन्हेगार शुभम उर्फ शिवम मनोज देशमुख (रा. लाकडी वखारीचे मागे सविंधान चौक अमळनेर) याच्यावर चोरी, खुनासह दरोडा, मोक्का, जबरी चोरी, घरपोडी, अशा प्रकारचे २७ गुन्हे दाखल असुन ऑगस्ट २०२२ महिन्यात जामीनावर सुटुन बाहेर आला होता. त्यानंतर त्याने घरात घुसुन जबरी चोरी तसेच दोन मोटर सायकलीचे चोरीचे गुन्हे केले होते व त्यात तो फरार होता. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सदर आरोपीला लवकरात कर अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यावरुन अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नमुद आरोपीचा शोध घेणे सुरु होते. त्यावरुन तो काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी धुळे शहरात त्याच्या बहीणी कडे आला असल्याची गोपनीय माहीती पो.नि. जयपाल हिरे यांना मिळाल्यावर सदर माहिती पथकाला देवुन पो.नि. जयपाल हिरे यांच्यासोबत पो.उप.नि. अनिल भुसारे, पो.हे.कॉ. सुनिल हटकर, पो.ना.मिलींद भामरे, पो.ना.सुर्यकांत साळुंखे, पो.काँ. अमोल पाटील, पो.काँ. निलेश मोरे, पोकाँ समाधान पाटील यांनी धुळे येथे जावुन त्याच्या बहिणीकडून ताब्यात घेतले. त्याच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला जबरी चोरी, व मोटर सायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्यांत तो फरार असल्याने त्यास अटक करण्यात आली असल्याचे अमळनेर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.