अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण शिवारातील गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे.
सपोनि जयेश खलाणे यांना मिळालेल्या माहितीनुसार सबगव्हाण येथील भिल्ल वस्तीत उषाबाई प्रवीण भील ही महिला गावठी दारू विकत असल्याने पोलिसांनी छापा टाकला असता महिलेस चाहूल लागल्याने सदर महिला मुद्देमाल सोडून निघून गेली. त्याठिकाणी १५०० रुपये किमतीची १३ लिटर तयार दारू मिळून आली नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. व सदर महिलेच्या विरोधात दारूबंदी कायदा ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.