अमळनेर:- येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रांतांना निवेदन दिले.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले आयुष्य पणाला लावून अनेकांना शिक्षण दिले. मात्र आकस बुद्धीने अपमानास्पद विधान करून चंद्रकांत पाटील यांनी समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचा हेतू पुरस्कर प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर शाई फेकणाऱ्या, तसेच पत्रकार व फोटोग्राफर यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे व निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत घेण्यात यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. यावेळी पितांबर वाघ, राहुल बैसाने, प्रवीण संदानशिव, संदीप नगराळे, राहुल वाडेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.