
व्ही स्कूल ॲपवर सर्वाधिक वेळ अभ्यास केल्याबद्दल केला सत्कार…
अमळनेर:- व्ही स्कूल ॲपवर सर्वाधिक वेळ अभ्यास केल्याबद्दल मारवड जि. प. शाळेच्या विद्यार्थिनींना बक्षीस वितरण करण्यात आले.
अमळनेर पंचायत समितीतील पूज्य साने गुरुजी सभागृहात गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी पी. डी.धनगर, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे मारवड केंद्र प्रमुख शरद सोनवणे, केंद्र प्रमुख साळुंखे तसेच तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. व्ही स्कूल ॲप मध्ये तालुक्यात सर्वाधिक वेळ अभ्यास केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळविले. सप्टेंबर २०२२ मध्ये प्रथम क्रमांक कु. माहेश्वरी रवींद्र साळुंखे, द्वितीय कु. प्रज्ञा दिग्विजय साळुंखे, तृतीय दिव्यांनी समाधान शिंदे यांनी तर ऑक्टोबर 2022 मध्ये प्रथम क्रमांक माहेश्वरी रवींद्र साळुंखे आणि तृतीय क्रमांक मानसी शशिकांत शिंदे यांनी मिळवला. त्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.







