
तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजन, चित्रकला स्पर्धेचेही बक्षिस वितरण…
अमळनेर:- तालुका विधी सेवा समिती च्या वतीने मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी पी देशपांडे यांनी मुलींना सुरक्षेसाठी व गंभीर घटना टाळण्यासाठी पोक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले. कनिष्ठ स्तर न्यायाधीश अमिता यादव यांनी मानवी हक्क व अधिकार याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. तर वकील संघाचे सदस्य ऍड आर व्ही निकम यांनी महिलांवरील ऍसिड हल्ला व त्या प्रकरणातील तरतुदी मिळणारा मोबदला याबाबत आणि सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी विधी सेवा समितीची कार्ये विशद केलीत.
तसेच यावेळी संविधान दिनानिमित्त न्यायालयीन विभाग व तालुका विधी सेवा समिती तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम जागृती ज्ञानेश्वर पाटील, द्वितीय हर्षदा दिलीप पाटील, तृतीय मोहिनी आनंदा पाटील, उत्तेजनार्थ साई चिंतामण बोरसे व जयश्री अधिकार पाटील यांना बक्षिसे देण्यात आली तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सुर्यवंशी, प्रभूदास पाटील, राजेंद्र पाटील, सीमा मोरे, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, राहुल पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील , प्रदीप पाटील, खुशाल पाटील, न्यायालयीन कर्मचारी सुनील पाटील, सोनवणे हजर होते.







