अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होण्यापूर्वी दरवर्षी शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेतले जाते. यंदाही शाळास्तरीय विज्ञानप्रदर्शन संपन्न झाले आहे.
या शालेय उपक्रमामुळे प्रत्येक वर्गातील मुलांना सहभाग घेता येतो. मागील आठवड्यापासून अथक परिश्रमाने मुले तयारी करीत होते. गटशिक्षणाधिकारी यांच्या भेटीचे निश्चित झाल्यावर दिनांक 15 डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनात 50 मॉडेल तयार करण्यात आले होते.त्यात टाकाऊपासून टिकाऊ मॉडेल सुद्धा होते. विज्ञान प्रदर्शनात शासनाच्या परिपत्रकात दिलेल्या विषयानुसार मुलांनी प्रयोग केलेले होते.विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन शिक्षणाधिकारी व्ही. एच. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेन्द्रलाल कोठारी होते. या विज्ञान प्रदर्शनासाठी पी. डी धनगर, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, केंद्रप्रमुख व तज्ज्ञ मार्गदर्शक सोनवणे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या अधिकारी यांचा सत्कार संचालक मंडळातील सुनिल छाजेड, दिपचंद छाजेड, योगेंद्रसिंग पाटील, आर. जी. चौधरी यांनी केला.शाळेचे पर्यवेक्षीय अधिकारी जी. टी. टाक यांनी चोख नियोजन केले.विज्ञान शिक्षक आर.सी. बडगुजर, एन. डी पाटील, डी.डी. जाधव, आर. आय. सूर्यवंशी, व्ही. एच. चौधरी यांनी विशेष मेहनत घेत सर्व शिक्षकांनी योग्य तयारी साठी सहकार्य केले.