
माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन…
अमळनेर:- निवडणूक कार्यात सहभागी कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानापासून वंचित ठेवू नका असे निवेदन माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पाटील यांनी तहसीलदारांना दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व इतर विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. मात्र यातील काही कर्मचारी निवडणूक होत असलेल्या गावातील मतदार असून त्यांच्या मतदानासाठी शासनाने कोणतीही तरतूद केली नाही. ग्रा. पं. निवडणुकीत एका मतामुळे ही जय पराजय होवू शकतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मतदानाचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेवू नये, अशी मागणी माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय कृष्णा पाटील यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.







