
अमळनेर:- येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रामानुज यांची १२५ वा जयंती दिवस राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.
मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य रावसाहेब के. डी. पाटील होते, मंचावर संस्थेचे अध्यक्ष डी डी पाटील ,पाहुणे क्रीडा शिक्षक तथा पत्रकार संजय पाटील, गणित शिक्षक डी ए.धनगर उपस्थित होते.
दैनंदिन जीवन जगत असताना आपण गणित विषयाचा वापर व्यवहारात करत असतो असे, संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच धनगर सरांनीही विद्यार्थ्यांना गणित विषयासंबंधी मौलिक मार्गदर्शन केले. गणित दिनानिमित्त शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते, यावेळी विद्यार्थ्यांनी ५० उपकरणांची मांडणी केली होती.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस व्ही पाटील, एस. एस सोनवणे, एन के पाटील आदिंनी सहकार्य केले तसेच प्रा.नयना पाटील, प्रा.वैशाली मोरे, शांतिनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर उपस्थित होत्या.
याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी पाटील केले. भाग्यश्री वानखेडे आभार मानले.







