स्मारकस्थळी उपस्थित मान्यवरांशी विद्यार्थ्यांनी केले हितगुज…
अमळनेर:- येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्यावतीने पु साने गुरुजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने अमळनेर येथील पु.साने गुरुजी यांच्या पुतळ्याला मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी शिक्षकवृंद विद्यार्थ्यांसह पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर पु.साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे विद्यार्थ्यांनी भेट देऊन उपस्थित लेखक व सामाजिक कार्यकर्त्यांसह मान्यवरांसोबत हितगुज केली.
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी साने गुरुजी स्मारक भूमीला भेट देऊन साने गुरुजी जयंती निमित्त कर्मभूमी स्मारक येथे उपस्थित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश भाई पाटील सुप्रसिद्ध लेखक, चित्रकार अनिल सोनार, सेवानिवृत्त प्राचार्य अरविंद सराफ, चेतन भाऊ सोनार, स्मारक समितीच्या कार्यकर्त्या दर्शना पवार, गोपाळ नेवे,श्रीराम चौधरी,सुनिल पाटील महाराष्ट्र शासनाचा नुकताच साहित्यिक पुरस्कार प्राप्त नवोदित लेखिका श्वेता पाटील आदींनी सरस्वती विद्या मंदिर च्या विद्यार्थी विद्यार्थिनींशी यावेळी हितगुज केली. याप्रसंगी सरस्वती विद्यामंदिर चे मुख्याध्यापक रणजीत शिंदे, उपशिक्षक आनंदा पाटील, उपशिक्षिका सौ गीतांजली पाटील, उपशिक्षक ऋषिकेश महाळपुरकर ,धर्मा धनगर, तसेच सहकारी सौ शितल पाटील,सौ पुनम पाटील,मनोज बिऱ्हाडे यांचेसह सागर गुजर,किरण शिसोदे ,किशोर महाजन ,लकी पवार,शुभम चौधरी,कल्पेश पाटील आदी उपस्थित होते.