
सन्मानपत्र व पदक देवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला गौरव…
अमळनेर:- येथील एनसीसीत कार्यरत असणारे वरिष्ठ लिपिक सुनील सोनार यांना सन्मानपत्र व पदक देवून गौरविण्यात आले.
४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेरचे वरिष्ठ लिपिक सुनील मुरलीधर सोनार यांना डायरेक्टर जनरल एनसीसी प्रशंसा पत्र व पदक देण्यात आले. बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल विवेक भटारा व प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल समीर बोडस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळेस एनसीसीचे पदाधिकारी उपस्थित होते. याबद्दल पूर्ण महाराष्ट्रातील एनसीसी अधिकारी व कर्मचाऱ्यातर्फे सुनील सोनार यांचे अभिनंदन केले जात आहे.







