अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन-मारवड येथील काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी पारोळा येथून भाविकांनी पायी दिंडी काढत दर्शन घेतले.
सालाबादप्रमाणे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी पारोळा येथून भाविक पायी येथे असतात. यंदाही पारोळा येथून वाजत गाजत व उत्साहात निघालेली पायी दिंडी हि २ रोजी सायंकाळी कालभैरवनाथ मंदिर येथे पोहचली. यावेळी भाविकांनी सांज आरतीचा मान घेत दर्शन घेतले. मंदिर संस्थान व ग्रामस्थांकडून उपस्थित भाविकांचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दिलेल्या सुविधा व सन्मानाबद्दल पायी दिंडीतील सहभागी भाविकांनी मंदिर संस्थान व ग्रामस्थांचे आभार मानले.