
अमळनेर:- तालुक्यातील सावखेडा शिवारातील तापी नदीपात्रात अंदाजे ४ वर्षाच्या बालकाचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंगसे येथील पोलिस पाटील भरत निकुंभ यांनी दिलेल्या खबरीनुसार दिनांक ३ रोजी सावखेडा शिवारातील तापी नदीपात्रात अंदाजे ४ वर्षाच्या बालकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला असून अंगात विना बाहीचा टी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पँट, गोल चेहरा, डोक्यावर बारीक केस असे त्याचे वर्णन असल्याचे नमूद केले आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारींना व नागरिकांना ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







