
अमळनेर:- तालुक्यातील रूंधाटी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रमोद पवार यांची बिनविरोध करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेली ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी मालुबाई धनराज पवार ह्या विजयी झाल्या होत्या. काल ४ जानेवारी रोजी उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने अर्ज असल्यामुळे निवडणूक अधिकारी प्रतिक पाटील यांनी प्रमोद पवार यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

त्यावेळी सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक नितिन कठोडे, ग्रामपंचायत सदस्य विजय बाविस्कर, निलेश पवार, मनीषा पाटील, रेखाबाई पवार, रत्नाबाई पवार, उषाबाई भिल, कर्मचारी वसंत पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.










