
अमळनेर पोलिसांनी केली धडक कारवाई…
अमळनेर:- शहरातील शाह आलम भागातून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीस अमळनेर पोलिसांनी ४८ तासांच्या आत जेरबंद केले आहे.
दि.०२ जानेवारी रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्यादी इम्रानखान हबीब खान पठाण रा. अमळनेर यांच्या मालकीची युनिकॉन कंपनीची मोटार सायकल हि शाहआलम नगर येथील राहत्या घरा समोरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाल्यावरून पोना. मिलींद भामरे, पोना.सुर्यकांत सांळुखे, पो.गणेश पाटील, पो. निलेश मोरे यांना मार्गदर्शन करुन लागलीच शहरात तसेच इतरत्र रवाना केले असता तपास पथकाने शाहआलम नगर येथील राहणारा व आठ महिन्यांपूर्वी मोटार सायकलचा चोरीचा गुन्ह्यात अटक झालेला अनिल दिलीप धोबी यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने साथीदार हैदरअली मोहम्मदअली सैय्यद रा.बाहेरपुरा, अमळनेर यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ. प्रमोद पाटील हे करित आहेत. दोन्ही गुन्हेगारास ४८ तासांच्या आत जेरबंद केल्याने अमळनेर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







