अज्ञात आरोपीविरुद्ध मारवड पोलिसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून नेल्याची घटना दिनांक ५ फेब्रुवारी रोजी घडली असून मारवड पोलीसात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कळमसरे येथील दाम्पत्य आपल्या दोन्ही मुलीसह राहत असून दिनांक ५ रोजी सकाळी दाम्पत्य मजुरीला गेल्यानंतर दोन्ही मुली घरीच होत्या. त्यापैकी १६ वर्षीय मोठी मुलगी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास काही न सांगता घरातून निघून गेली. संध्याकाळी घरी आल्यावर आई वडिलांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी आजूबाजूला परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलीचा तपास न लागल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेल्याची खात्री झाली. मुलीची आई विमलबाई पारधी यांनी फिर्याद दिल्यावरून मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. करीत आहेत.