
अमळनेर येथील भोई समाज बांधवांनी दिले प्रशासनाला निवेदन…
अमळनेर:- शिरपूर येथील २२ वर्षीय तरुणाच्या हत्येतील आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी अमळनेर येथील भोई समाज बांधवांनी करत तश्या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी व अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना दिले आहे.
शिरपूर येथील राहुल राजू भोई या २२ वर्षीय तरुणाचा ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी धारदार हत्याराने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना समाजात दहशत निर्माण करणारी असून सदर घटनेचा सखोल तपास करून आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदनावर भोई समाजबांधवांच्या सह्या असून प्रांताधिकारी व अमळनेर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना समाजबांधवांच्या उपस्थितीत देण्यात आले.







