
अमळगाव येथील घटना, पोलिसांत तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील बीएसएनएलच्या कार्यालयातून तीस मीटर तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली असून याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उपमंडळ अभियंता पंकज रायसिंघानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी अमळगाव येथील बीएसएनएलच्या कार्यालयातील उपकरणे बंद पडल्याचा मेसेज आल्याने त्याठिकाणी भेट दिली असता बॅटरी पासून पॉवर प्लांट पर्यंत जाणाऱ्या प्रत्येकी १० मीटरच्या ३ कॉपर केबल चोरी झाल्याचे दिसून आले. यावेळी एक्झोस्ट फॅन हा काढल्याचे दिसून आले. त्यामुळे एक्झोस्ट फॅन काढून त्या मार्गे कार्यालयात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने ही केबल चोरुन नेली आहे याची खात्री झाल्याने मारवड पोलीसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पो. ह. संजय पाटील करीत आहेत.







