
अज्ञात चोरट्याविरुद्ध महावितरणच्या अभियंत्याने दिली फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील धार शिवारातील अज्ञात चोरट्याने महावितरणची १२०० मीटर लांबीची अल्यूमिनियमची तार चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धार शिवारातील तंत्रज्ञ समाधान जाधव हे दिनांक ७ रोजी डीपी व लाईन चेक करण्यासाठी गेले असता त्याठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वरिष्ठांना कळविले. त्यानतंर मुख्य तंत्रज्ञ बडगुजर, जाधव व शिवारातील शेतकरी यांनी मिळून पाहणी केली असता एकूण १२०० मीटर लांबीची ४० हजार रुपये किमतीची अल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्याने पोल वरून कट करून नेली असल्याचे लक्षात आले. त्यावरून सहायक अभियंता प्रफुल्ल पाटील यांनी मारवड पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पीएसआय बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.







